गोंदियातील पुजारी टोला धरणाचे दोन द्वार उघडले

गोंदिया ◼️ प्रादेशिक हवामान विभागाने गोंदिया जिल्ह्यात आज मंगळवार 27 जून रोजी सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सर्वदूर संततधार सुरू असून नदी, नाले, जलाशयांच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून खबरदारीचा इशारा म्हणून प्रकल्पाचे दोन द्वार आज सकाळी ०.३० मीटर ने उघडण्यात आले आहेत. यामधून 45.18 क्युमेक ( 1596 क्युसेक ) विसर्ग सुरू आहे. नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Share