देवरी नगरपंचायत येथे गुणवंत विद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न

देवरी ◼️ तालुका आदिवासी आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. स्पर्धेच्या युगात या भागातील विद्यार्थी सुद्धा रणांगणात उतरलेला असून मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना दम देतांना दिसून येत आहे. त्याचाच सन्मान व्हावा आणि तालुक्यात गुणवत्ता विकास आणि स्पर्धेचे वातावरण निर्माण व्हावे यावा उद्देशाने देवरीच्या नगरपंचायततर्फे तालुक्यातील १० वी आणि १२ वी च्या परीक्षेत तालुक्यात अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत देवरीचे आद्यनागरिक तथा नगराध्यक्ष संजू उइके प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्षा प्रज्ञा संगीडवार, नगरसेवक रितेश अग्रवाल, संजय दरवडे, सरबजीतसिंह भाटिया, पंकज शहारे, शकील कुरेशी, नगरसेविका नूतन सयाम, पिंकी कटकवार, तनुजा भेलावे, कमल मेश्राम, सुनीता शाहू, हिना टेंभरे आदि मंचावर उपस्थित होते.

दरम्यान देवरी तालुक्यातील सर्वच माध्यमातील अव्वल आलेल्या विद्यार्थांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये

वर्ग 10 वी (सीबीएसई) श्रुती लक्ष्मीशंकर मरकाम 95.80%, निलय आशिष गाढवे 94.00%, सिमा विष्णु गाडधे 91.60,

वर्ग 10वी ( स्टेट बोर्ड) ईशिता चरणदास उंदरवाडे 96.40%, जान्हवी निलेशकुमार शाहु 96.20%, वेदांत धार्मिक डोंगरवार 95.80%, संस्कृती सुभाष लांजेवार 95.80%

वर्ग 12 वी ( कला) नगमा दुलाराम मरई 85.50%, पावेश यशवंत शहारे 85.17%, कमलेश संजय तुरकर 84.33%

वर्ग 12 वी (विज्ञान) रुचिता प्रकाश खैरे 90.67%, मानसी लेखराम चांदेवार 85.33%, दिक्षा यशवंत दरवडे 80.17% , नंदिनी विरेंद्र मडावी 80.17%

यावेळी उपस्थित सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे नगरपंचायतीचे अध्यक्ष आणि नगरसेवकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Share