30 वर्षापासून फरार आरोपी गोंदिया पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गोंदिया◼️ मा. न्यायालय, जिल्हा गोंदिया यांचे आदेशान्वये स्टॅंडिंग वॉरंट काढलेल्या आरोपींना न्यायालयापुढे समक्ष हजर करण्याबाबत आदेशित करून स्टँडिंग वॉरंटद्वारे हुकूम जारी करण्यात आलेला होता.

सदर बाबीच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे , अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया अशोक बनकर यांनी माननीय न्यायालयाने जारी केलेल्या स्टॅंडिंग वॉरंट मधील आरोपींचा शोध घेऊन त्यांना न्यायालयापुढे समक्ष हजर करण्याबाबत सूचना देवुन,विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देशित केले होते. या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली माननीय न्यायालयाने जारी केलेल्या हुकमाची अंमलबजावणी करण्याकरिता आरोपींचा शोध घेऊन स्टॅंडिंग वॉरंट ची बजावणी करून आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. या अनुषंगाने दिनांक 26 मे 2023 रोजी महासमुंद जिल्हा – रायपूर येथील आरोपी मोहिद्दीन वलद् साबुद्दीन शेख यास त्याचे राहते पत्ता सेशनपारा, महासमुद जिल्हा -रायपूर येथून ताब्यांत घेण्यात आले. आरोपीस अटक करण्यात येऊन मा. न्यायाधीश, न्यायालय देवरी , यांचे कडील स्टँडिंग वॉरंट जारी केले असल्याने आरोपीस पोलीस स्टेशन देवरी येथे न्यायालयापुढे हजर करण्या संबंधाने स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपी मोहीद्दीन शेख याचेवर पोलीस ठाणे देवरी येथे अपराध क्रमांक 39/ 1993 कलम 219, 338, 304 (अ) भादवी अन्वये दिनांक 27/06/ 1993 ला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. मा. न्यायालय,देवरी स. फौ. खटला क्रमांक 48/ 2008 असे असून सुप्त फाईल क्रमांक 08/ 2011 कलम 219, 338, 304 (अ) भादवी गुन्ह्याचा अपराध केल्याचा त्याच्यावर आरोप असल्या ने स्टॅंडिंग वॉरंट काढण्यात आले होते. आरोपी हा 1993 ला गुन्हा केल्याच्या तारखेपासून अटके पासून आपले अस्तित्व लपवून फरार होता. अश्या मा. न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट द्वारे आदेश जारी केलेल्या 30 वर्षा पासून फरार आरोपीचा शोध घेऊन आरोपीस विशेष मोहीम राबवून पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. सदरची कामगिरी माननीय वरिष्ठांचे निर्देशान्वये व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात विशेष मोहीम राबविणारे पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा. ठाकरे, पो.ना.कटरे, पोशि झाडे, खोब्रागडे, चापोना शहारे यांनी कामगिरी केलेली आहे. माननीय वरिष्ठांनी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस अंमलदारांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Share