आरोग्यसेविकेचा विनयभंग करुन ठार मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

तिरोडा◼️तालुक्यातील लाखेगाव येथील आरोग्य उपकेंद्रात कर्तव्यावरील आरोग्यसेविकेचा विनयभंग करुन ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना 28 मे रोजी रात्री 12 वाजता घडली. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

लाखेगाव येथील आरोग्य उपकेंद्रात रात्री 12 वाजताच्या सुमारास एक महिला प्रसुतीसाठी चारचाकी वाहनातून आली. पीडित आरोग्यसेविकेने तिला रुग्णालयात नेल्यावर नातेवाईक वाहनातून सामान काढत असताना तिथे नितीन मोहनलाल देशमुख (वय 30) व अश्विन मोहनलाल देशमुख (26) रा. लाखेगाव तिथे पोहोचला व गाडी इथे का ठेवली असे म्हणत भांडण केले. प्रसंगी आरोग्यसेविकेने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना अश्लिल शिवीगाळ करीत तिचे कपडे फाडून विनयभंग केला. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम 353, 354, 354 ब, 323, 298, 506, 509, 34 व अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Share