HSC परीक्षेत छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील रुचिता खैरे तालुक्यातून प्रथम

देवरी◼️ वर्ग १२ वी बोर्डाच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त करून छत्रपती शिवाजी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथील विद्यार्थांनी उत्कृष्ठ यश संपादन केले.
वर्ग 12 वी विज्ञान शाखेत कु. रुचिता प्रकाश खैरे हिने 600 पैकी 544 गुणांसह 90.67% गुण मिळवून तालुक्यातून तसेच विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावले. तसेच कु. मानसी लेखराम चांदेवार हिने 512 गुणासह 85.33% गुण मिळवून विद्यालयातून द्वितीय क्रमांक तर कु. नंदिनी विरेंद्र मडावी हिने 481 गुणासह 80.17% गुण मिळवून विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकावले. तसेच वर्ग 12 वी कला शाखेतून कु. मनिषा सुमरण करसाल हिने 600 पैकी 458 गुणांसह 76.33% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक, कु. खुशबू रविंद्र बावने हिने 448 गुणासह 74.67% गुण मिळवून विद्यालयातून द्वितीय क्रमांक तर कु. सानिका सागर डोये हिने 432 गुणासह 72.00% गुण मिळवून विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकावले.
कृ.स.त.शि.सं. देवरीचे अध्यक्ष झामसिंगजी येरणे , कृ.स.तं.शि.सं देवरीचे सचिव अनिल येरणे , मनोजकुमार भुरे (प्राचार्य), वर्ग १२ वी बोर्डाच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Share