देवरी शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सर्व मालमत्ता देवरी नगरपंचायतीला हस्तांतरित करा: नगराध्यक्ष संजू उईके

◼️जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदनातून मागणी

देवरी ◼️महाराष्ट्र शासन राजपत्र अन्वये देवरी ग्राम पंचायतचे नागरी क्षेत्रात रुपांतर झाल्यानंतर नागरी क्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या संपुर्ण मालमत्ता, हक्क व दायीत्व हे नगर पंचायतच्या मालकीचे होतात. त्यानुसार देवरी नगर पंचायत क्षेत्रातील गोंदिया जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असणाऱ्या सर्व मालमत्तांचे हस्तांतरण करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असणाऱ्या सर्व मालमत्तांचे हस्तातरणेबाबतची कार्यवाही करण्याबाबत वरील संदर्भिय पत्र कक्ष अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, यांचे पत्र क्र.झेडपीवी 2015/प्र.क्र.7/प.रा.-5 दि. 13 जुलै 2015 आणि मा. ना. श्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वन, सा. कार्य व मत्स व्यवसाय यांचे पत्र दिनांक 03/02/2023 अन्वये देवरी शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असणाऱ्या सर्व मालमत्तांचे हस्तातरण देवरी नगर पंचायतीला करण्याबाबत सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वन, सा.कार्य व मत्स व्यवसाय यांनी कळविले आहे. तरी देवरी शहरातील विकास कामांना अडथडा निर्माण होऊ नये व नगर पंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने देवरी शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असणाऱ्या सर्व मालमत्ता देवरी नगर पंचायतीला हस्तातंरण करण्याची कार्यवाही व्हावी असे निवेदन देवरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संजू उईके यांनी मा. जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिले आहे. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी गोंदिया चौधरी साहेब यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी नगराध्यक्ष संजू उईके यांच्यासह देवरी नगरपंचायतीचे सभापती तथा नगरसेवक संजय दरवडे उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share