लम्पी आजाराने तीन जनावरांचा मृत्यू

गोंदिया ◼️लम्पी आजार आटोक्यात आल्याचे चित्र असतनाच या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. गोंदिया जिल्ह्यातील चिखली येथील तीन जनावरे एक आठवड्यात लम्पीने दगावली असून परिसरातील अनेक जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मागील वर्षी राज्यात जनावरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला. मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली. लम्पी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात जनावरांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे हा आजार आटोक्यात आला. असे वाटत असतनाच जिल्ह्यातील ग्रामीण भागात या आजाराने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात लम्पी आजार झपाट्याने पसरत असून शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली व परिसर नवेगाव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन बफर क्षेत्रात असल्याने पाळीव जनावरांसोबत इतर वन्यजीवांनाही लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून लसीकरणाची गरज आहे. चिखली येथील सोयीसुविधा युक्त असा जिल्ह्यातील सर्वात मोठा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र, मागील सहा वर्षांपासून या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारीच नाही. एक सहायक कर्मचार्‍यावर दहा-बारा गावांची जबाबदारी असल्याने जनावरांची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. या ठिकाणाची जबाबदारी प्रभारींच्या खांद्यावर असून येथे त्वरीत पशुवैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें