मानव विकास समितीच्या सदस्यपदी सविता पुराम यांची निवड

देवरी ◼️जिल्हा मानव विकास समिती अंतर्गत जिल्हा मानव विकास समिती गोंदिया या कार्यालयाचे समितीवर नामनियुक्त केलेला एक सभापती सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचे आदेशित होते. त्या अनुषंगाने गोंदिया जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण सभापती सविता संजय पुराम यांची जिल्हा मानव विकास समिती येथे एक सभापती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवरी तालुक्यातील समस्त जनतेने त्यांच्या या नियुक्ती बद्दल आनंद व्यक्त केले आहे.

Share