कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती! आदिवासी मुलींचे वस्तीगृह देवरी येथील ४ मुलींची पोलीस शिपाई पदी निवड
देवरी ◼️एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह देवरी क्रमांक एक येथील कु.मीनाक्षी मडावी , कु.दामिनी गुदेवार , कु.ललिता खोबा , कु.हेमलता मडावी या चार विद्यार्थिनीने 2023 या सत्रामध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून यश संपादन केले आहे. या यशाबद्दल वस्तीगृह समारोप कार्यक्रमाप्रसंगी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव व सत्कार करण्यात आला.
नक्षलगतग्रस्त व दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ज्या ठिकाणी वाहने इतर सोयी सुविधांचा अभाव असणाऱ्या गावातील या विद्यार्थिनींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून आपल्या प्रतिभेची सुनुक दाखविली. प्रकल्प अधिकारी यांनी या सत्कार सोहळा व समारोपय कार्यक्रमाप्रसंगी वसतिगृहातील इतर विद्यार्थिनींना शिक्षण अतिशय अमुल्य भाग असून शिक्षणाने व्यक्ती घडतो असे मोलाचे मार्गदर्शन करून भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी शिपाई या पदापासून एक सर्वोच्च अधिकारी कसे बनता येईल याबाबत मुलीना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित सहाय्य प्रकल्प अधिकारी एच. आर.सरियाम यानी आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थिनींनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार यांनी सुद्धा विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रास्ताविका वस्तीगृह गृहपाल कु. एम. एस. बढे यांनी केले तर संचालन वस्तीगृह विद्यार्थिनी रिंकी उइके व आभार स्नेहा पंधरे यांनी मानले.