पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत आभा कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड भव्य कॅम्पचे आयोजन

गोदिया जिल्हा दलातर्फे व पोलीस स्टेशन देवरी सौजन्याने व डिजिटल ग्रामीण सेवा यांचे संयुक्त विदयामाने उपक्रम

देवरी ◼️कम्युनिटी पोलीससिंगच्या माध्यमाने दादा लोरा खिडकी योजनेर्तेत पोलीस ठाणे देवरीमार्फत मौजा टोयागोंदी येथे आभा कार्ड आयुष्यमाण कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड भव्य कॅम्पचे आयोजन केले होते मा.पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या संकल्पनेतुन. मा. अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन दादालोरा खिडकी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी याकरिता गोंदिया जिल्हा पोलीस दल व डिजिटल ग्रामीण सेवा केंद्र यांचे संयुक्त विदयामाने २६ मार्चला आभा कार्ड ,आयुष्यमान कार्ड ,आधार कार्ड अपडेट योजना कॅम्प मौजा टोयागोंदी येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कॅम्पला पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण डांगे यांनी भेट देवुन मार्गदर्शन केले . आयोजित कॅम्पला अतिदुर्गम आदिवासी नक्षल प्रभावित भागातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कॅम्पमधे २०० ते २५० सामान्य नागरािंनी सहभाग घेतला . १९४ नागरािंच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी त्यांचयाकडुन विविध प्रकारचे शासकीय सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे आवश्यक सर्व कागदपत्रे घेण्यात आले. कॅम्पला सुंदरीदंड, दर्रोटोला, कोसाटोला, भरेंगाव येथिल आदिवासी महिला पुरुषांनी सहभाग नोंदविला.

Share