कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार जात प्रमाणपत्र !

अर्जुनी/मो◼️पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री.निखिल पिंगळे यांनी कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमाने अतिदुर्गम आदिवासी नक्षल प्रभावित भागातील वि्दयार्थ्यांचे उज्वल भवितव्या साठी आदिवासी नक्षल प्रभावित भागातील जनता व विद्यार्थी यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी या संकल्पनेतून जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे यासाठी तसेच त्यांच्यात सामाजिक सुधारणा, प्रगती व्हावी या उद्देशाने अतिदुर्गम परिसरातील शाळेत कार्यक्रम राबविण्या बाबत तसेच जनजागृती करण्या बाबत निर्देश देवून आदेशित करण्यात आले होते.

या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने केशोरी परिसरातील तालुका अर्जुनी मोरगाव, अंतर्गत शाळेमध्ये इयत्ता 01 ली ते 10 वी मध्ये प्रवेशित अनु. जाती, अनु. जमाती, इमाव, विजा, भज, विमाप्र इत्यादी प्रवर्गातील बऱ्याच विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसल्याची बाब निदर्शनास आल्याने तसेच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढतांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन परिसरातील विद्यार्थ्यांना कश्याप्रकारे जात प्रमाणपत्र तयार व उपलब्ध करून देता येईल या करीता मा. वरिष्ठांचे निर्देश व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केशोरी चे स.पो.नि. श्री.कदम, श्री. शेख यांनी या संबंधात शिक्षण विभाग, तसेच उपविभागीय कार्यालय, अर्जुनी मोरगाव यांना या संबंधाने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आले. श्री. खोब्रागडे यांचेशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली असता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व शाळा यांचे सहकार्यातून शाळेत जातीचे दाखले देण्या संबंधात शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाले असून उपविभागीय कार्यालय, अर्जुनी मोरगाव यांनी शिबिराचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

दिनांक 31 जानेवारी 2023 ते 07 फेब्रुवारी 2023

सर्व केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांनी ज्या विद्यार्थाकडे जातीच दाखले नाहीत त्यांची यादी तयार करुन अर्ज भरुन घेणे, दाखल्या साठी लागणारे कागदपत्र जमा करने , शुल्क रक्कम जमा करणे,

दिनांक 08 फेब्रुवारी 2023 ते 11 फेब्रुवारी 2023

केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांनी प्राप्त झालेले अर्ज सेतु चालक यांकडे सादर करणे व सेतुचालक यांनी प्राप्त अर्ज तपासून घेणे व ऑनलाईन नोंद करणे,

दिनांक 12 फेब्रुवारी 2023 ते 15 फेब्रुवारी 2023

उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडुन ऑनलाइन मंजुर मुख्याध्यापक यांचे मार्फत शाळेत उपलब्ध करुण देण्यात येईल.

Share