पारा चढला तरी गोंदिया सर्वात ‘थंड’

गोंदिया: मागील आठवड्यात रविवार, 8 जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्वाधिक कमी तापमान 6.8 अंश नोंदले गेले. त्यानंतर सातत्याने तापमानात वाढ होत असली तरी गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वाधिक थंड राहत आहे. आज 18 जानेवारी रोजी गोंदियाचे किमान तापमान 13.5 नोंदले गेले. हे सरासरीच्या तुलनेत 3 अंशाने अधिक होते.

मागील आठवड्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली व त्यामुळे अचानकच थंडीचा (Cold) जोर वाढला होता. तब्बल 9 वर्षांनंतर यंदा पारा 7 अंशांखाली आल्याची नोंद रविवार, 8 जानेवारी रोजी घेण्यात आली. या दिवशी जिल्ह्यात 6.8 अंश कमाल तापमान नोंदले गेले. यानंतर थंडीचा जोर काहीसा कमी झाला असला तरी विदर्भात मात्र सर्वाधिक कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात होत आहे. यामुळे सकाळी व सायंकाळी बाहेर पडताना जिल्हावासीयांना गरम कपडे घालूनच बाहेर पडावे लागत आहे.

Share