ब्लॉसम स्कुलमध्ये जन्माष्टमी उत्साहात साजरी

देवरी : ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी येथे कृष्णा जन्मोत्सव प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली थाटात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून डिम्पल काळे , प्राचार्य डॉ. सुजित टेटे प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमामध्ये ब्लॉसम नर्सरी केजी चे छोटे राधाकृष्ण आकर्षक वेशभूषेत सहभागी झालेले होते. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे परीक्षण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डिम्पल काळे यांनी भूमिका पार पाडली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पेन्सिल चॉकलेट वितरण करण्यात आले. कृष्णाच्या वेशभूषेत सहभागी झालेले गोविंदानी दही हंडी फोडली आणि उत्साहात जन्माष्टमी साजरी केली. सदर कार्यक्रमाच्या यशासाठी शिक्षक नितेश लाडे, विश्वप्रित निकोडे, अजित टेटे, कलावती ठाकरे, मनीषा काशीवार , तनुजा भेलावे राहुल मोहुर्ले सह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन ठाकरे यांनी केला असून आभार प्रदर्शन मनीषा काशिवार यांनी मानला.

Print Friendly, PDF & Email
Share