शिंदे सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल प्रतिलटर ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

राज्य सरकारने पट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने पट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी केली आहे. राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेगवेगळी विकासकामे तसेच योजनांच्या अमंलबजावणीवर चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील घोषणा केली.

Share