नगरसेवकाने जिप शाळेत झाडे लावून साजरा केला लेकीचा वाढदिवस

◼️नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया यांनी जिप शाळेला पंखे भेटवस्तू देत केला लेकीचा वाढदिवसात साजरा

प्रहार टाईम्स

देवरी 14 : नगरपंचायत देवरीचे युवा नगरसेवक सरबजीत भाटिया यांनी आपल्या मुलीचा 5 वा वाढदिवस देवरी येथील जिप शाळेत 5 रोपटे लावून आणि भेटवस्तू म्हणून 5 पंखे देऊन साजरा केला. सरबजीतसिंग भाटिया यांनी आपली लेक सचरूप कौर हीचा पाचवा वाढदिवस जी.प.शाळेत साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देत शाळेला पाच पंखे भेट देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजू उईके, नगरसेविका सुनीता साहू , हिना टेम्भरे, पंकज शहारे , विलास शिंदे , सीमरन कौर भाटिया, मुख्याध्यापक मंगमुर्ती सयाम आणि शिक्षक उपस्थीत होते.

Print Friendly, PDF & Email
Share