गोंदिया जिल्ह्यातील तलाव संपूर्ण सुकण्याच्या मार्गावर

गोंदिया: जिल्ह्यात मे महिन्यात तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने नागरिकांची लाहीलाही होत आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पासह लघु तलावातील पाण्याची पातळीत घट होऊन लागली आहे. या सर्व तलावांमध्ये केवळ 9.32 टक्केच जलसाठा असल्याची माहिती आहे.

तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र सध्या जिल्ह्यातील तलावच कोरडे पडू लागले आहेत. सद्यस्थितीत पाटबंधारे विभागाच्या अख्त्यारीतील 9 मध्यम प्रकल्पात 10.804 दलघमी पाणीसाठी असून त्याची टक्केवारी 10.83 टक्के आहे. यात बोलकसा धरणात सर्वाधिक कमी केवळ 1.031 दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 6.60 आहे. तर हीच अवस्था लघु प्रकल्पांची आहे. आजघडीला जिल्ह्यातील 22 लघु प्रकल्पांमध्ये 5.830 दलघमी जलसाठा आहे. त्याची टक्केवारी 7.16 टकके आहे. तर मामा तलावांचीही अशीच स्थिती आहे. जिल्ह्यातील 38 मामा तलावांतही पाणीसाठा घटल्याचे चित्र आहे. आजघडीला या तलावात 2.519 दलघमी पाणी असून त्याची टक्केवारी 10.36 एवढी आहे. एकंदरीत जिल्ह्यातील मध्यम, लघु व मामा तलावांची सध्याची स्थिती पाहता सर्व तलावांना कोरड पडल्याचे चित्र आहे. तर केवळ 19.153 दलघमी पाणीसाठा शिल्लक असून त्याची टक्केवारी 9.32 आहे.

या तलावात शून्य जलसाठा

जिल्ह्यातील मध्यम तलावात 5 टक्क्यांच्या वर पाणीसाठा असला तरी काही लघु तलावांसह मामा तलावात पाण्याचा थेंबही Lakes drying up नसलयाचे संबंधित विभागाच्या अहवालावरुन दिसून येत आहे. यात सोनेगाव व ओवारा या लघु प्रकल्पात शून्य टक्के पाण्याची नोंद असून रेहाडी 0.34, सालेगाव 0.47, सडपार 0.33, बेवारटोला 0.50 टक्के जलसाठा आहे. तर मामा तलावात भानपूर, गिरोला, धाबेटेकडी, नांदलपार, ताडगाव या तलावांत पाणीसाठा नसून पुतळी तलावात 0.23 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

Share