देवरीची डॉ.प्राची विनोदकुमार अग्रवाल NEET PG परीक्षेत देशात AIR 1713 वी

डॉ. सुजित टेटे

देवरी 02: राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (National Board Of Examination) बुधवारी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-PG (NEET PG) चा निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी NEET PG निकाल जाहीर झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली. या वर्षीच्या परीक्षेचे एक विशेष हे आहे की, यंदा NEET PG चा निकाल अवघ्या दहा दिवसामध्ये जाहीर केला गेला आहे. आरोग्य मंत्री मांडविया यांनी ट्विट करून पात्र उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

सदर परीक्षेमध्ये देवरी ची डॉ. प्राची विनोदकुमार अग्रवाल हिने AIR 1713 मिळविला असून तिच्या यशाबद्धल वडील विनोद अग्रवाल आई नेहा अग्रवाल , बहीण सूचिता , भाऊ अमित सुमित यांच्या सह कुटुंबातील मंडळी, यांनी शुभेच्छा दिल्या.

डॉ. प्राची हिने GMC नागपूर येथून 2020 मध्ये MBBS पूर्ण केले होते. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय देवरी येथे 3 महिने सेवा दिली. अगोदर पासून NEET PG करण्याचे स्वप्न असल्यामुळे तयारी करायला सुरुवात केली होती. यामध्ये तिला यश मिळाले असून सर्वस्तरावून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

यंदा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने अवघ्या 10 दिवसात NEET PG चा निकाल जाहीर केला आहे. 21 मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.

Share