राष्ट्रसेविका समितीचे प्राथमिक प्रशिक्षण शिबिर 4 जूनपासून

गोंदिया: राष्ट्र सेविका समितीचे जिल्हास्तरीय प्राथमिक प्रशिक्षण शिबिर 4 ते 11 जून या कालावधीत स्थानिक रामनगर सरस्वती शिशू मंदिर परिसरात करण्यात आले आहे. शिबिरात 12 वर्षांवरील भगिनी सहभागी होणार आहेत. शिबिरात सकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत शारीरिक विकास, मानसिक व बौद्धिक विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दररोज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व घडविण्यासाठी गाणी व विविध विषयांवर चर्चा, शारीरिक व्यायामाचे प्रशिक्षण, डंबेल चालवणे, लेझीम आदी प्रशिक्षण दिले जाणार आहे. समितीच्या जिल्हा कार्यवाह वीणा धानोरकर यांनी अधिकाधिक मुली, मातांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Share