लोकशाही मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य देवरी तालुका कार्यकारिणी गठीत

◼️अध्यक्षपदी प्रमोद महोबिया तर सचिव पदी प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांची नियुक्ती

देवरी 31: लोकशाही मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य देवरी तालुका कार्यकारिणी गठीत नुकतीच गठीत करण्यात आली असून सदर संघाचा नोंदणी क्रमांक Reg. No. MH-1357 (Reg. Under Maharashtra Public Trust Act. 1860 Govt. of Maharashtra) असं आहे. या पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदावर दैनिक भास्कर चे तालुका प्रतिनिधी प्रमोद महोबिया , उपाध्यक्ष पदावर नवभारत चे तालुका प्रतिनिधी अर्शद शेख , सचिव पदावर प्रहार टाईम्स चे संपादक प्रा. डॉ. सुजित टेटे , उपसंघटक पदावर देशोन्नती प्रतिनिधी विनोद सुरसावंत , सदस्य पदावर बेरार टाईम्सचे सुभाष सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील लोकांच्या समस्य प्रशासनासमोर मांडण्यासाठी, निर्बीड आणि पारदर्शक पत्रकारितेचे मूल्य जपण्यासाठी महाराष्ट्र स्तरावर सदर पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे देवरी तालुक्यातील इतर कुठल्याही पत्रकार संघाचे वरील कार्यकारिणीचे कुठलेही संबंध नसून फक्त लोकशाही मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य देवरी तालुका या संघाशी एकनिष्ठ आहेत. सदर माहिती जनहितार्थ माहितीस्तव जाहीर करण्यात येत आहे.

सदर कार्यकारीच्या निवडीबद्दल देवरी तालुक्यातील प्रतिष्ठित मंडळी , अधिकारी -कर्मचारी , मित्र मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें