शाळा व्यवस्थापन समिती सभा संपन्न

देवरी ■ स्थानिक छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे ६ मे रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. जी. भुरे तर प्रमुख अतिथी सुरेश टी. मेश्राम उपस्थित होते.

यावेळी सभेमध्ये शालेय पोषण आहार वाटप, मागील सत्रातील उन्हाळा सुट्टीतील प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण, शालेय गुणवत्ता तसेच सायकल वाटप अशा विविध दर्शविला. विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेमध्ये उपस्थित सर्व सदस्यांनी प्रत्येक विषयावर आपला होकार दिला. शाळेच्या विकास आणि गुणवत्तेसाठी सतत प्रयत्न करावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें