२५ एप्रिल ला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम, सर्व शाळेत होणार साजरा

गोंदिया 23: राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेअंतर्गत सर्व आंगणवाडी, सर्व शासकीय शाळा / शासकीय अनुदानित शाळा/नगरपालिका, सर्व खाजगी अनुदानित शाळा, सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कुल, गुरुकुल, संस्कार केंद्र, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना दिनांक २५ एप्रिल रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनी वयोगटानुसार ॲलबेंडाझोल गोळी खाऊ घालणे आहे. ही मोहिम जिल्ह्यासोबतच गोंदिया तालुक्यात सुध्दा राबविण्यात येणार आहे.

उपविभागीय अधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना आदेशित करुन सदर मोहिम १०० टक्के यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आंगणवाडी सेविका व प्रत्येक शाळेतील एक नोडल महाविद्यालयात शिक्षक यांचे एक दिवशीस प्रशिक्षण २३ एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याबाबत आदेशित केले. तालुक्यातील सर्व शहरी/ग्रामीण भागातील मुला- मोहिम यशस्वी करण्यासाठी

मुलींना १०० टक्के जंतनाशकाची गोळी खाऊ घालणे व १ ते १९ वर्ष वयोगटातील एकही लाभार्थी मोहिमेपासून वंचित राहणार नाही याकरीता २५ एप्रिल २०२२ रोजी सर्व आंगणवाडी, सर्व शाळा, सर्व मुला-मुलींची उपस्थिती १०० टक्के राहील याकरीता शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभागांना सुचना करण्यात आल्या आहेत.

Share