◼️अपघाताच्या घटना वाढल्या; उन्हाळ्यात काळजी घेणे गरजेचे
गोंदिया▪️ सर्वच जिल्ह्यात तापमान वाढत आहे. विदर्भात तर अधिकच तापमान वाढत असल्याने धावत्या वाहनांचे टायक फुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी वाहन चालविताना चालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
टायरची तपासणी करून खात्री करून घ्यावी. वाढत्या तापमानामुळे डांबरी तथा सिमेंटरचे रस्ते अधिक प्रमाणात तापतात. उन्हात वाहन एकसारखे चालवीत असल्यास टायर आणि रस्त्याच्या घर्षणाने टायर फुटण्याची शक्यता असते. महामार्ग वगळता बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत, तर बऱ्याच रस्त्यावरील गिट्टी उखडलेली आहे. याचा वाहनांच्या टायरला अधिक धोका असतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी दुपारी वाहन न चालविलेलेच बरे. टायरच्या ट्युबची हवा वरचेवर तपासत राहावे. अधिक हवेमुळेही टायर फुटण्याचा धोका असतो. जिल्ह्यात टायक फुटून बऱ्याच वाहनांना अपघात झाले असून, अनेकांचा जीवही गेला आहे. त्यामुळे वाहने चालविताना टायक बरोबर आहे काय, हे तपासण्याची गरज आहे.








