देवरी येथे तालुका आरोग्य शिबीर मेळाव्याचा उदघाटन
देवरी 19: (प्रा. डॉ. सुजित टेटे ) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने दि.१९/०४/२०२२ रोज मंगळवारला सकाळी ९ ते दुपारी १.०० वाजे पर्यत ग्रामिण रुग्णालय देवरी जि.गोंदिया येथे तालुका आरोग्य मेळावा शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असुन या शिबिराचा उदघाटन आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिप सदस्य सविता पुराम, डॉ. आनंद गजभिये वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, देवरी , डॉ. ललित कुकडे तालुका आरोग्य अधिकारी देवरी, नितेश वालोदे, पंकज शहारे , सुनीता शाहू , शकील कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर शिबीरात १) आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यासाठी नोंदणी २) आयुष्मान भारत डिजीटल अभियान अंतर्गत हेल्थ आयडी नोंदणी ३) प्रधानमंत्री जनआयोग्य योजना बाबत नोंदणी. ४) महात्मा फुले जन आरोग्य योजना बाबत नोंदणी. ५) कुपोषित बालक व दुर्धर बालके, अतिजोखमी च्या माता व गंभीर रोगाने ग्रस्त सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येईल. https://prahartimes.com
सदर मेळाव्याची वैशिष्टे: माता बालक सेवा, नवजात अर्भक सेवा, किशोरयीन आरोग्य सेवा वयोवृंद उपचार, कुटूंब नियोजन संसर्गजन्य आजार सेवा नेत्र रोग, मोतीया बिंदू नाक, कान, घसा उपचार कर्करोग, मधुमेह उपचार क्षयरोग, सिकलसेल सेवा इत्यादी आहेत. सदर आरोग्य शिबीर ग्रामिण रुग्णालय, देवरी येथे आयोजन जिल्हाधिकारी प्रशासन व आयोग्य विभाग प्रशासन गोंदिया जिल्हा यांनी केले आहे.