आमदार विक्रम काळे यांची गोंदिया जिल्ह्यातील परिक्षा केंद्रांना आकस्मिक भेट
गोंदिया 20: शिक्षक आमदार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाचे सदस्य विक्रम काळे यांनी 19 मार्च रोजी इंग्रजी विषयाच्या पेपरच्या दिवशी गोंदिया येथील जि.ई.एस.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यलय पांढराबोडी, गुजराती हायस्कूल,बंगाली हायस्कूल या ठिकाणी सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वर्ग १० वीच्या परिक्षा केंदावर अचानक पोचून परिक्षा केंद्राची पाहणी केली.कोरोना काळ सावरल्यानंतर प्रत्यक्षात होणारी १० च्या या परिक्षेत विद्यार्थि शिक्षक मुख्याध्यापक व रणर यांना कोणत्या समस्या भेडसावत आहे.या संदर्भात सर्वांशी प्रत्यक्षात चर्चा करुन समस्या जाणून घेतले.सर्व केंद्रावर सुरळीत परिक्षा सुरु असल्याचे पाहून आमदार विक्रम काळे यांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागातील शाळा म्हणून जी.ई.एस.हायस्कूल पांढराबोडी येथील मुख्याध्यापक बि.एच.जिवाणी,यु.शी.रहांगडाले व इतर शिक्षकांशी चर्चा करुन शिक्षक व विद्यार्थि यांच्या समस्या जाणून घेतल्या.भविष्यात संगणकीय शिक्षणाला शिक्षण प्रक्रियेत फार महत्त्व असल्यामुळे राज्यातील सर्वच शाळेत संगणक व संगणक शिक्षक मिळवून देऊ असे आश्वासन विक्रम काळे यांनी दिले.
चर्चेदरम्यान प्रदिप राठोड,पी.जी.परशुरामकर,व्हि.एम.माने,जि.एम.दुधबरई यांनी जुनी पेंशन संदर्भात विचारले असता महाराष्ट्राती सर्व शिक्षकांना पेंशन मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे मत यावेळी आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी पथकातील महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष खेमराज कोंडे,नागपूर विभागीय कार्याध्यक्ष देवेंद्र सोनटक्के,उपाध्यक्ष अशोक काणेकर,प्रदिप राठोड,जिल्हाध्यक्ष रवींद्र रहांगडाले यांनी केद्राची पाहणी केली व मुख्याध्यापिका रिझवाना पी.अदमद,मुख्याध्यापक संतोष ठाकुर कार्तिक पटेल,ब्रिजेश पटेल ,यांच्याशी चर्चा करुन परिक्षा सुरळीत सुरु असल्याची माहिती मिळवली.