धक्कादायक! रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात सिनेमागृहाखाली ढिगाऱ्याखाली तब्बल ११०० पेक्षा जास्त लोक गाडले गेले

पॅरिस : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला आता जवळपास २५ दिवस होत आहेत. दरम्यान, दोन्ही देशातील हल्ले अजूनही सुरूच आहेत. दरम्यान, या हल्ल्यात युक्रेनच्या हजारो निष्पाप लोकांचा बळी जात आहे. त्यातच नुकत्याच रशियाने युक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात मारियुपोलमधील एक थिएटर पूर्णपणे उद्धवस्त आले. मात्र यावेळी एक धक्कादायक घटना घडली ती म्हणजे या ढिगाऱ्याखाली तब्बल ११०० पेक्षा जास्त लोक गाडले गेले आहेत.

थिएटरच्या ढिगाऱ्याखालून तिसऱ्या दिवशीही ११०० हून अधिक लोकांना अद्याप बाहेर काढता आले नाही. थिएटरच्या तळघरात 1300 लोकांनी आश्रय घेतला होता, त्यापैकी फक्त १३० लोकांना बाहेर काढता आले. नाट्यगृह पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. स्थानिक आपत्कालीन सेवांशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर शनिवारपर्यंत मदत आणि बचाव कार्यात कोणतेही मोठे यश मिळालेले नाही. चित्रपटगृहात बहुतांश महिला आणि मुले लपून बसली होती.

जसजसा अधिक वेळ जात आहे, तसतशी ढिगाऱ्यातून लोकांच्या सुरक्षित सुटकेची आशाही संपत येत आहे. शनिवारी स्थानिक खासदारांनी सांगितले की, बचाव पथकावरही रशियाकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. मारियुपोलचे महापौर वद्यम बोइचेन्को म्हणाले की, शहरात सर्वत्र रशियन हल्ल्याचे अवशेष आहेत.

शहरात असा एकही भाग नाही जिथे रशियन हल्ल्याच्या खुणा नाहीत. आज रशिया-युक्रेन युद्धाचा 25 वा दिवस आहे. युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये संघर्ष सुरू आहे. युक्रेनच्या मारियुपोल शहराला रशियाने चारही बाजूंनी वेढा घातला असून तेथे सतत हल्ले सुरू आहे.

Print Friendly, PDF & Email
Share