आश्रमशाळेतील विध्यार्थ्यांना मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण

◾️प्रकल्प अधिकारी-विकास राचेलवार यांच्या हस्ते तीन दिवशीय भविष्यवेधी शिक्षण विचार प्रशिक्षणाचे उद्घाटन


देवरी 01: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत शासकिय आश्रमशाळांतील प्राथमिक व पदवीधर शिक्षकांसाठी तिन दिवसीय जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार प्रशिक्षणाचे आयोजन एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल बोरगाव बा. येथे दिनांक 25/02/2022 ते 27/02/2022 या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आलेले होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन विकास राचेलवार प्रकल्प अधिकारी, ए. आ. वि. प्र. देवरी यांच्या हस्ते करण्यात आला. या तिन दिवसीय प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना सुलभकांद्वारे कृतियुक्त प्रशिक्षण देण्यात आले. रवींद्र ठाकरे अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांच्या संकल्पनेतून आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील 100 टक्के मुलांच्या 100 टक्के क्षमतांचा विकास साधण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते दि.25 ला पहिल्या सत्रात भविष्यवेधी शिक्षण म्हणजे काय? याविषयी माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे गट तयार करूनछोटे छोटे खेळ व मोकळिका घेण्यात आले.यामुळे विध्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळेल व सहकार्य भावना विकसित करण्यात वर भर देण्यात यावा असे शिक्षकांना सांगण्यात आले.दुसर्या सत्रात ब्लॉसम स्कूल देवरी चे प्राचार्य डॉ. सुजित टेटे सरांचे गेस्ट लेक्चर झाले. त्यामध्ये सरांनी विध्यार्थ्यांच्या विकास करण्यासाठी शिक्षकांनी अद्ययावत ज्ञान प्राप्त करावे व स्पर्धेत टिकणारा विध्यार्थि घडवावा असे सांगितले. दि.26 ला सुलभक सपना मैडम यांनी छोटा खेळ घेऊन ध्येय कसे पुर्ण करावे?याविषयी प्रशिक्षण दिले नंतर सहसुलभक लांजेवार मैडम,खोब्रागडे मैडम पटले मैडम यांनी आपल्या घटकावर आधारित प्रशिक्षण दिले. स्वपासुन सुरुवात करणे कीती कठीण असेल तरी प्रयत्न करतच राहणे peer लर्निंग विषयी प्रशिक्षण देण्यात आले. नंतर विध्यार्थ्यांना देण्यासाठी आव्हाने काढून आणण्यास सांगितले. दिं 27 ला पहिल्या सत्रात शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा?याचे प्रशिक्षण सुलभक मांडे सरांनी दिले. नंतर गटचर्चा घेऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांना येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात या विषयी प्रश्न विचारण्यात आले. शिक्षण विषयक नवीन नवीन ऐप ची माहिती दिली. दुसऱ्या सत्रिप्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक 27/02/2022 ला दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विकास राचेलवार प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्र. देवरी हे होते व प्रमुख अतिथी मा. अशोक बनकर, अपर पोलिस अधिक्षक गोंदिया हे होते तसेच सहायक प्रकल्प अधिकारी सौ.मिश्रा मॅडम, श्री. सोनवणे सर, पाळेकर सर, श्री. एन. एल. भाकरे मुख्याध्यापक आश्रमशाळा बोरगाव बा. श्री. डी.झेड. हुकरे प्राचार्य एकलव्य बोरगाव बा. इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी मा. बनकर साहेबांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या विद्यार्थ्याना एक आदर्श नागरिक बनवा असे आवाहन त्यांनी केले. मा.राचेलवार साहेबांनी प्रशिक्षणात जे काही तुम्ही आत्मसात केले ते सर्व ज्ञान प्रत्यक्ष शाळेत गेल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी उपयोगात आणा अश्या सूचना सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना दिल्या व यामध्ये तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर मला सांगा माझ्या कार्यालया मार्फत त्या अडचणी दूर करण्यात येतील असे आपल्या भाषणाद्वारे सांगितले. यावेळी काही शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेकरीता सुलभक प्रतिभा गोहणे, सपना मानकर व सहसुलभक श्री.मांडे, कु. लांजेवार, कु. पटले कु. खोब्रागडे, श्री. रामटेके तसेच सहायक प्रकल्प अधिकारी सौ.मिश्रा मॅडम, श्री. सोनवणे सर, पाळेकर सर, श्री. एन. एल. भाकरे मुख्याध्यापक आश्रमशाळा बोरगाव बा. श्री. डी.झेड. हुकरे प्राचार्य एकलव्य बोरगाव बा. व दोन्ही शाळेतील शिक्षक, अधिक्षक, अधीक्षिका, सर्व कर्मचारी वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन कु. शहारे मॅडम व आभार प्रदर्शन श्री. लिंबोरे सर यांनी केले.

Share