ग्रा.पं. शेडेपार व आदर्श आमगाव येथे रोजगार हमी योजनेच्या कामाचे शुभारंभ

■ आमदार कोरोटे यांच्या हस्ते तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन

देवरी ०२: देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत शेडेपार अंतर्गत कलचुवा व ग्रा.पं. आदर्श आमगावं येथे बुधवार( ता.०२ फेब्रुवारी) रोजी रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर झालेले तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी शेडेपार येथे उपसरपंच योगराज भाजीपाले, रोजगार सेवक बाखन राऊत, कार्यकर्ता अरविंद उके, बैजुराम टोपे, नेतराम मडावी आणि आदर्श आमगावं येथे सरपंच रेखाबाई तरोने, ग्रामसेवक हेमंत दिहारी, रोजगार सेवक इंद्रपाल वाघमारे, कार्यकर्ता ब्रिजलाल वाघमारे यांच्या सह दोन्ही ठिकाणी कामावर आलेले मजुरवर्ग बहूसंख्येने उपस्थित होते.

Share