गोंदिया: ८ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गांना ग्रीन सिग्नल
◾️जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय कोविड प्रोटोकॉल पाळणे बंधनकारक ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय ठेवावा
गोंदिया 25 : जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व
माध्यमाच्या शाळा वर्ग ८ वी ते 12 वी चे वर्ग 01 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी शिक्षण विभागाला निर्देशदिले आहेत. या विषयी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल
पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिल चव्हाण यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा
करण्यात आली. या अनुषंगाने खालील निर्देशाचे पालन करून शाळा सुरू करण्याबाबत सूचना निर्गमित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले. सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग 01 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात यावे. शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती व ग्राम स्तरावरील कोरोना
समितीची सभा घेण्यात यावी. इयत्ता 8 वी ते 12 वी च्या सर्व
विद्यार्थ्यांचे लसीकरण कॅम्प आयोजित करुन लसीकरण करुन घ्यावे (वयोगट 15 ते 18). शाळा दररोज 3 ते 4 तास घेण्यात यावी. पटसंख्या अधिक असलेल्या शाळांनी एक दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलवावे. सर्व पालकांकडून त्यांच्या पाल्यांना शाळेत येण्यासंबंधाने सम्मतीपत्र लिहून घेण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे शंभर टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने पालकांना प्रोत्साहन द्यावे व जनजागृती करावी. जास्त विद्यार्थी असलेल्या
शाळेमध्ये सकाळ, दुपार पाळीत वर्ग भरविण्यात यावे. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक राहील.
- विद्यार्थ्याला ताप आणि उलटी येत असेल तर त्वरित कोविड तपासणी
- करणे बंधनकारक राहील. मैदानावरील खेळ, स्नेहसम्मेलन, परिपाठ यासारख्या
- गर्दीच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर कडक निर्बंध राहतील. विद्यार्थ्यांना
- सर्दी, खोकला, ताप असल्यास शाळेत येण्यास सक्ती करण्यात येवू नये. सर्व
- शिक्षकांनी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी व शाळास्तरावर काम करणाऱ्या इतर
- कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक राहील.
- शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी हात धुण्यासाठी हॅण्डवॉश स्टेशन उभारण्यात
- यावे व विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करण्याबाबत सूचना
- देण्यात याव्यात. तसेच हात धुण्याकरिता साबण उपलब्ध करुन देण्यात यावे.
- विद्यार्थ्यांना वैयक्तीक स्वच्छता नेहमी पाळण्यास आवाहन करण्यात यावे.
- विद्यार्थ्यांना सोबत पाणी बॉटल आणण्यासाठी आदेशित करावे.
- विद्यार्थ्यांनी आपसात कोणत्याही प्रकारच्या साहित्याचे (पुस्तक, पेन,
- पेन्सील पाण्याची बॉटल) व मास्कचे अदलाबदल करु नये याची दखल घेण्यात
- यावी.
- वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल अशी व्यवस्था करण्यात
- यावी. दोन बाकामध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात यावे. शाळा वर्ग नियमित
- निर्जंतुकीकरण करण्यात यावे. पालकांनी सहमती नाकारल्यास त्यांच्या
- पाल्यांकरिता ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु ठेवण्यात यावे. गटशिक्षणाधिकारी,
- विस्तार अधिकारी व केन्द्रप्रमूख, विषय साधनव्यक्ती, फिरते विशेष शिक्षक
- यांनी शाळेमध्ये भेटी देवून कोविड-19 नियमांचे काटेकोरपणे पालन केल्या
- जात आहे अथवा नाही याची शहानिशा करुन तसा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांचे
- मार्फत शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) यांना दररोज दुरध्वनीव्दारे
- कळविण्यात यावा. वर्ग 1 ते 7 सुरु करण्याबाबत यथावकाश कळविण्यात येईल.
- शासन परिपत्रकातील परिशिष्ट अ व ब चे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेश दि. 01 फेब्रुवारी 2022 ते 15.फेब्रुवारी 2022 या कालावधीपर्यंत लागू राहील. तदनंतरचा निर्णय यथावकाश कळविण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कळविले आहे.