देवरीच्या जवानाला बिहारमध्ये वीर मरण

देवरी 14: देवरी तालुक्यातील शिलापूर गावातील वीर जवान महेंद्र चन्द्रकुमार बोपचे (30)यांचा आज आर्मी प्रशिक्षण कॅम्प मध्ये उच्च प्रवाह असलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. यामध्ये इतर 3 जवानांचा समावेश असून 8 जवान गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

एसएसबी 45 बटालियन च्या वीरपुर कैंप मध्ये शुक्रवार ला मोठी घटना घडली. विजेचे करंट लागण्याने एक कांस्टेबल सहित तीन जवानांचा मृत्यू झाला असून आठ जवान गंभीर असल्याचे वृत्त आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच शिलापूर गावात शोककळा पसरली असून या घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share