“केवळ पित्याला दिलेलं वचन म्हणून मी मुख्यमंत्रीपदावर बसलोय”

मुंबई : शुक्रवारी सन्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटली होती. त्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे.

केवळ पित्याला दिलेल वचन म्हणून मी मुख्यमंत्रीपदावर बसलो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजपने आम्हाला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता, असा दावा शिवसेनेने वारंवार केला आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला दिलेलं वचन मोडल नसतं, तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता, असा म्हणत अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. अहंपणा आला की, माणूस संपला. अहंपणाला कधीही तुझ्या डोक्यात येऊ देवू नको,असं माझ्या आईवडिलांनी शिकवलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें