मगरडोह ग्रामसभेच्या सदस्यांनी वनहक्कासंबंधी घेतली शरद पवारांची भेट

डॉ. सुजित टेटे
देवरी 16:
गोंदिया जिल्हातील बहुतांश तालुके हे आदिवासी बहुल म्हणून ओळखले जातात परंतु या भागात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी आणि इतर पारंपरिक वननिवासी असून त्यांना वनहक्क अधिनियम 2006 अन्वये वैक्तिक आणि सामुहिक धारणाधिकार मिळाले असून त्यांना सदर नियमाच्या अधिनिस्त स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी आणि उपजीविकेसाठी त्यांना पाहिजे ते काम करण्याचे हक्क मिळाले आहे.
परंतु राजपत्रित अधिनियमांव्ये शासनाच्या वन विभागाच्या एकाधिकारशाहीमुळे वंचित राहावे लागत असून मगारडोह वनहक्क समिती ग्रामसभा यांनी सदर अनिभव प्रत्येक्षात घेतला असून वनहक्क अधिनियम 2006 नुसार कुठलेच कार्य होत नसल्यामुळे बिरसा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम यांच्या नेतृत्वात शिष्ठमंडळ शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली.

या बैठकीत राज्य वनमंत्री दत्तात्रेय भरणे , गृह निर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड उपास्थित होते. या बैठकीत आदिवासी व पारंपरिक वननिवासी या समाजाच्या वन , गृह विषयक समस्या आणि प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

लवकरच संबंधित समस्या आणि प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले.

या शिष्ठमंडळात मगरडोह वनहक्क समिती ग्राम सभाचे अध्यक्ष देवविलास भोगारे , यांच्या सह संयुक्त ग्राम सभा पालांदूर जमी. चे उमेश बागडीरिया, राजू नायडू , राकेश भलावी उपस्थित होते.

Share