नगर परिषद काटोलयेथील शिक्षण लिपीक अडकला एसीबीच्या जाळ्यात
नागपूर : पेंशनच काम करून दिल्याचा मोबदला म्हणून २ हजार रूपयांची लाच रक्कम स्विकारतांना नगर परिषद काटोल जि. नागपूर येथाील शिक्षण विभागातील लिपीक कृष्णा गंगाधरराव मानकर (५८) यांना लाप्रवि पथकाने रंगेहाथक पकडले आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे काटोल जि. नागपूर येथील रहिवासी असून सेवानिवृत्त शिक्षक आहेते. ते सेवानिवृत्त होण्यापुर्वी पेंशन संबधाने तसेच सर्व्हिसबुक तयार करणे व सेवानिवृत्ती नंतरची थकबाकी संबंधाने विचारपूस करण्याकरिता नगर परिषद काटोल येथील शिक्षण लिपीक कृष्णा गंगाधरराव मानकर यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांचे सर्व कामे करून देण्याकरिता २ हजार रूपये लाच रकमेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची कोणतीही इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि नागपूर येथे तक्रार दाखल केली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पोलीस उपअधिक्षक श्रीमती योगिता चाफले यांनी गोपनियरित्या सापळा करावाईचे आयोजन केले. त्यामध्ये आरोपी शिक्षण लिपीक कृष्णा मानकर यांनी तक्रारदार यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची सर्व थकबाकी तसेच पेंशनचे काम करून दिल्याचा मोबदला म्हणून काल ११ ऑक्टोबर रोजी २ हजार रूपये लाच रकमेची मागणी करून काटोल आठवडी बाजार येथे स्वत: स्विकारल्याने लाप्रपि नागपूरच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यावरून आरोपी शिक्षण लिपीक कृष्णा मानकर यांच्या विरूध्द पोलीस स्टेशन काटोल जि. नागपूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाप्रवि नागपूरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक श्रीमती योगिता चाफले, पोलीस निरीक्षक श्रीमती संजीवनी थोरात, नापोशि रविकांत डहाट, अनिल बहिरे, पोशि अमोल मेंघरे, चामपोशी प्रिया नेवारे यांनी केली.