लायन्स क्लब देवरीच्यावतीने आज आरोग्य शिबीर

देवरी 24: नक्षलग्रस्त आणि आदिवासी भाग म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यात आरोग्य विषयक सोयी सुविधा तसेच वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य विषयक आरोग्य विषयक समस्या बघावयास मिळतात.

येथील लोकांना उपचारासाठी गोंदिया नागपूर या ठिकाणी जावे लागले त्यामुळे मोठा खर्च आणि वेळ सुद्धा वाया जात असते. यावर उपाय म्हणून लायन क्लब देवरी आणि सहयोग हॉस्पिटल च्या संयुक्त विद्यमाने देवरी येथे आफताब मंगल कार्यालयात दुपारी 11 ते 4 या वेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिराचे आयोजन पारस कटकवार, आफताब शेख , हमीद मेमन यांनी केले असून या निशुल्क आरोग्य शिबिरामध्ये डॉ.अशलेष तिवारी , डॉ. मयूर चौरे , डॉ .मुनेश्वर सूर्यवंशी, डॉ आदित्य महाजन , डॉ अनुप अग्रवाल ,डॉ प्रदीप जुडा ,डॉ सुमित पिसे , डॉ मणिंदर जांभुळकर , डॉ केवल धोने आदी उपस्थित राहणार आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें