Breaking: विराट सोडणार कर्णधारपद

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराट कोहलीने स्वत:च ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटर हँडलवर विराटने एक पत्रच ट्वीट केले असून त्यामध्ये आपल्या निर्णयाविषयी त्याने सविस्तर लिहिले आहे. दरम्यान, आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचे विराटने या पत्रात म्हटले आहे. आपल्या पत्रामध्ये विराट कोहलीनं त्याला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, रोहित शर्मा, रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचं विराट कोहलीनं पत्रात म्हटलं आहे. विशेषत: आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या आधीच त्यानं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें