ओबीसी बहुजन महासंघाची कार्यकारीणी गठीत

देवरी अनेक दशकांपासून ओबीसी समाजावर होत असलेला अन्याय कायमचा नष्ट करण्यासाठी ओबीसी समाजाची जनगणना करण्यासाठी ओबीसी समाजाची एकता निर्माण करुन केंद्र शासनाकडून घर संपर्क अभियानात ओबीसी समाजाचा रकाना समाविष्ट करण्या संदर्भात अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष व्ही. टी. पटले यांच्या अध्यक्षतेखाली ७ जूनला देवरी येथील विश्रामगृहात बैठक घेऊन तालुका कार्यकारीणी गठीत करण्यात आली.
तालुकाध्यक्ष म्हणून राम गायधने, उपाध्यक्ष छोटेलाल बिसेन, रतिराम दरवडे, सुरेश चन्ने, नरेश कुंभलकर, सचिव सुशील शेंद्रे, संदिप तावाडे, सहसचिव कृष्णा ब्राह्मणकर, घनश्याम फरकुंडे, कोषाध्यक्ष वामन बडवाईक, संघटन सचिव छुन्नू नेवरगडे, मार्गदर्शक सदस्य संतोष तिवारी, ॲड. प्रशांत संगीडवार, भय्यालाल चांदेवार, संदिप तिडके, नेमीचंद आंबीलकर, भोजराज हुड, वामनराव राऊत, दिपक कापसे, के. टी. कांबळे तर, तालुक्यातून जिल्हा कार्यकारीणीसाठी जिल्हा उपाध्यक्ष शेखर कनोजे, राजेश चांदेवार आणि सहसचिव दिपक चुटे यांची उपस्थित सर्वानुमते निवड झाली आहे. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश पारधी, जिल्हा उपाध्यक्ष डी. टी. गौतम, महासचिव डॉ. प्रकाश पटले, गोरेगाव तालुकाध्यक्ष योगेश्वर चौधरी, सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष अभय फुले आदी उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें