विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल कौशल्यांची ओळख
देवरी: कॅम्पमध्ये Artificial Intelligence (AI), Cyber Safety, Typing Competition, PowerPoint Presentation (PPT) आणि Scratch Animation या विषयांवर विशेष प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी AI च्या विविध उपयोगांविषयी माहिती घेतली, तसेच इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षण आणि सायबर सुरक्षेचे महत्त्व समजून घेतले.
Typing Competition मध्ये विद्यार्थ्यांनी वेगवान व अचूक टायपिंग कौशल्याचे प्रदर्शन केले. PPT प्रशिक्षणाद्वारे प्रभावी सादरीकरण कसे तयार करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच Scratch Animation च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःची ॲनिमेशन प्रकल्प तयार करून सर्जनशीलता दाखवली.
या समर कॅम्पचे मार्गदर्शन व प्रशिक्षण कु. सामेश्री कोराम यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान कौशल्ये आत्मसात करत उत्साहाने सहभाग नोंदविला.
शाळेचे मुख्याध्यापक आर. एम. गुरनुले यांनी विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि डिजिटल साक्षरता वाढण्यास मदत होते, असे सांगितले.
समर कॅम्पच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.







