आपला मंत्री असला तरी चुकत असेल तर ठोकून काढा

बच्चू कडू यांचे वक्तव्य : देवरी येथे शिंदेसेनेचा मेळावा

देवरी : येथे शिंदेसेनेचा कार्यकर्ता मेळावा रविवारी (दि. ७) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदेसेनेचे आ. बच्चू कडू यांनी चुकीला मुळीच माफी नसून आपला मंत्री असला तरी चुकत असेल ठोकून काढा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मंचावर उपस्थित आणि मान्यवर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती.

आ. बच्चू कडू हे त्यांच्या आक्रमक शैली आणि बेताल वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यांच्यातील हा आक्रमकपणा अनेकदा त्यांना भोवलासुद्धा आहे. देवरी येथे रविवारी आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी जोशा जोशात कुणीही चुकत असेल तर वेळीच त्याची चूक त्याच्या लक्षात आणून द्या, चुकणाऱ्या माफ करू नका मग तो आपला मंत्री असला तरी त्याची मुळीच पर्वा करू नका असा सल्ला दिला. तसेच मला अनेक पक्षांमध्ये जाण्याच्या वाटा मोकळ्या होत्या. पण, मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जाण्याचा पर्याय निवडला कारण ते एकमेव मर्द आहेत असेही आ. बच्चू कडू म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मेळाव्यात यावरून चर्चा रंगली होती.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें