मुंबई : शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीची नवी नियमावली सादर करण्यात आली. बालरोगतज्ज्ञांच्या टास्कफोर्सने यात अनेक नवे बदल सुचवले आहेत. शाळांचे दिवस, शाळांमधले तास, मधली सुट्टी यात गर्दी टाळण्यासाठी आवश्यक बदल सुचवण्यात आले. तसेच शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक उभारण्याचीही सूचना करण्यात आली. शाळा सुरू करण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली आहे. मुलांना कायम घरात ठेवता येणार नाही असे टास्कफोर्सने म्हटले आहे.
विदयार्थी घरी राहिल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर भरपूर परिणाम होत आहे. तसेच मोबाइलचा वापर वाढल्यामुळे इतर समस्या देखील खूणावत आहेत. तसेच मुलांचे घराबाहेर पडणे बंद झाल्यामुळे त्यांना मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी आणि पालक यांच्यात तणावाच वातावरण पाहायला मिळत आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढत असल्याचे सर्वेशणात दिसून आले आहे.
शाळांसाठी नियमावली
– एका वर्गातली मुलांची संख्या कमी करा
– दोन शिफ्टमध्ये शाळा चालवा
– एक दिवसासाठी उपस्थिती दोन बॅच मधील अंतर वाढवा
– शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करा
– कोविडची लक्षणे, ताप दिसल्यास शाळेत पाठवू नका
– कोविडनंतर विद्यार्थी 14 दिवसांनी उपस्थित राहू शकतो
– एसी वर्गांना परवानगी देऊ नका
– टॉयलेट, व्हरांडा परिसर रोज दोनदा साँनेटाइझ करा
– रिक्षातून मुले कोंबून पाठवू नका
– एसी स्कूल बसला परवानगी नाही, बस मधील संख्या मर्यादित
– प्रत्येक शाळेत एक स्कुल क्लिनिक असावे
– शाळेतील मुले आजारी पडल्यास थेट रुग्णालयात
– मुलांना एकत्र जेवायला पाठवू नये
– खोखो, कबड्डीसारखे संपर्क येणारे खेळ खेळू नका
– मुलांची रोज तपासणी करण्याचे शिक्षकांचे प्रशिक्षण









