कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी…

नवी दिल्ली 29: दी़ड वर्षांपासुन भारतासह संपुर्ण जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच कोरोना लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. आता भारतात प्रामुख्याने देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींपैकी कोविशिल्डबद्दल केलेल्या अभ्यासातुन महत्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे.

कोविशिल्ड लसीच्या बाबतीत सशस्त्र सेना दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयातुन एक अभ्यास समोर आला आहे. त्यानुसारच कोविशिल्ड लस कोरोनावर 93 टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्र सरकारने लसीच्या परिणामतेवर सशस्त्र दलाच्या अभ्यासाचा संदर्भ देत कोविशिल्ड लस 93 टक्के प्रभावशाली असुन या लसीचा डोस घेतलेल्यांचा मृत्युदर हा 98 टक्क्यांपर्यंत कमी असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 

दरम्यान, लस किती प्रभावी आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना आता नवी माहिती समोर आल्याने कोविशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना दिलासा मिळत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. भारतामध्ये आतापर्यंत 45 कोटींहुन अधिक नागरिकांचं लसीकरण पुर्ण झालं आहे. 

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका असताना आता कोविशिल्ड लसीबाबत केंद्र सरकारने दिलेल्या दिलासादायक माहितीमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आता कोरोना आटोक्यात आला असला तरी लवकरात लवकर नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घेणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे.

Share