आमगावच्या पोलिस लॉकअपमध्ये मरण पावलेल्या मृतकाच्या कुटुंबियांना आमदार कडून आर्थिक मदत
आमदार कोरोटे यांनी पाळला आपला लोकप्रतिनिधिचा धर्म
देवरी/आमगांव, ता.१०: आमगावच्या पोलीस स्टेशन मधील कोठडीत २२ जून २०२१ रोजी मृत्यु झालेल्या राजकुमार अभयकुमार रा. कुंभारटोली/आमगांव यांच्या कुटुंबियांशी गुरुवार (ता.८ जुलै) रोजी भेट घेवून त्यांना धाडस देत या क्षेत्रात एक लोकप्रतिनिधि या नात्याने आमदार सहषराम कोरोटे यांनी आपल्याकडून एका धनादेश भेट देवुन त्यांची आर्थिक मदत केली आणि भविष्यात काही अडीअडचन आल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन ही दिले.
सविस्तर असे की, आमगांव पोलीस स्टेशन अंतर्गत शासनाकडून पुरविन्यात आलेले एल.ई.डी.टी.व्ही., कैरम बोर्ड व हिरवी चटाई अज्ञात इसमांनी चोरी केल्याची तक्रार १३ मार्च २०२१ रोजी करण्यात आले होते. यावरून पोलीसांनी गुन्हा दाखल करुण या चोरीच्या आरोपाखाली राजकुमार अभयकुमार वय ३० वर्ष रा.कुंभारटोली/आमगांव यांच्या सह इतर दोन आरोपींना २१ जून २०२१ रोजी अटक केली होती. या सर्वाना २३ जून २०२१ पर्यंत पोलीस कोठड़ी होती. या दरम्यान २२ जून २०२१ रोजी राजकुमार अभयकुमार यांचा मृत्यु झाला. हा प्रकरण आमदार कोरोटे यांनी वरिष्ठ स्तरावर उचलून धरला होता. शेवटी या मृत्यु प्रकरणात एक पोलिस अधिकारी व ३ पोलिस कर्मचारी निलंबित करण्यात आले. हा मृतक आपल्या कुटुंबात एकमेव कमावनारा व्यक्ति होता. यांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले. याची दखल घेत. या क्षेत्राचा एक सक्रिय लोकप्रतिनिधि या नात्याने आमदार सहषराम कोरोटे यांनी कुंभारटोली/आमगांव येथे या मृतकाच्या कुटुंबियांशी भेट घेवून त्यांना धाडस देत. आपल्याकडून एक धनादेश भेट देवुन त्यांची आर्थिक मदत केली आणि भविष्यात काही अडीअडचनी आल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी आमगांव तालुका काँग्रेस चे अध्यक्ष संजय बहेकार, आमगांव तालुका काँग्रेस चे संघटक महेश ऊके, महिला काँग्रेस च्या तालुकाध्यक्ष छबुताई ऊके, महिला कार्यकर्ता प्रभाताई उपराडे, काँग्रेस कार्यकर्ता तारेंद्र रामटेके, श्री. श्यामकुंवर यांच्या सह काँग्रेस पक्षाचे इतर कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.