IAS अनमोल सागर, देवरीचे प्रकल्प अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्त

डॉ. सुजित टेटे

देवरी 9: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी चे नवीन प्रकल्प अधिकारी तसेच गोंदिया जिल्हाचे उपजिल्हाधिकारी पदावर फेज -2 चे प्रशिक्षण पूर्ण करून आलेले IAS अनमोल सागर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबत चे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने नुकतेच काढले आहे .

IAS अनमोल सागर 2019 च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी आपले फेज -2 चे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे त्यामुळे त्यांना देवरी चे प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या विभागात नियुक्त करण्यात आलेले आहे.

IAS अनमोल सागर यांनी वयाच्या 23 व्या वर्षी UPSC 2018 परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यांचा AIR 414 होता.

Print Friendly, PDF & Email
Share