जवानाने स्वतः वर गोळी घालून केला आत्महत्येचा प्रयत्न

गोंदिया: येथील बिरसी कॅम्प येथील राज्य राखीव दलाच्या बटालियन क्रमांक 15 च्या एका पोलीस जवानाने स्वतः वर गोळी घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज दि.30 जूनच्या पहाटे 5 वाजे दरम्यान घडली. परसवाडा-बिरसी येथील भारत राखीव बटालियन -2 व राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 15 येथील पोलीस जवान मोरे, बक्कल नंबर 337 याने स्वतःवर गोळी झाडल्याने त्यावर प्राथमिक उपचार करुन सकाळी 7 वाजेच्या सुमारास नागपूरला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.सदर जवानाने आत्महत्या करण्याचा विचार का केला याबाबत अधिक माहिती अद्यापही कळू शकलेली नाही.

Share