“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट
मुंबई 14: गेल्या वर्षी 14 जूनला प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर या आत्महत्येने वेगळंच वळण घेतलं आणि हत्येचा विषय समोर आला. तसेच आज सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त अनेक लोक त्याचं स्मरण करत आहेत. यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंण्ड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे.
संबंधित पोस्टमध्ये रियाने अत्यंत भावनिक असं कॅप्शन लिहीलं आहे. लोक म्हणतात वेळ सरली की आपण माणसाला हळूहळू विसरतो मात्र माझ्यासाठी तुच माझी वेळ, माझे सर्व काही असल्याचं रियाने यामध्ये लिहीलं आहे. यानंतर तु वरुन दुर्बिनने मला पाहतो, तसेच माझे रक्षण देखील करतो हे मला माहित आहे, असं देखील रियाने लिहीलं आहे.आज हे सर्व लिहताना मनाला फार वेदना होत आहेत, असं म्हणत रियाने पुढे लिहीलं की, मी रोज कोलमडून जाते. मात्र नंतर मला तुझे बोल आठवतात. तु म्हणायचा तुझा बेबु आहे आणि मग मी स्वतःला पुढील दिवसासाठी तयार करायचे. जेव्हा मला वाटते की, तू इथे नाही आहेस, तेव्हा भावनांचे एक बंध माझ्या शरीराला पार करते.
दरम्यान, शेवट लिहीताना रियाने सर्वांना रडवून टाकलं आहे. तु तुझ्यासोबत माझं आयुष्य घेऊन गेला असून तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नसल्याचं रियाने म्हटलं आहे. जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरून निघू शकत नाही आणि मी तुझ्याशिवाय आजही एकटी उभी आहे, असं रियाने तिच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे. माझा प्रिय सनशाईन, मी आजही तुला दररोज मालपुआ खाऊ घालण्याचे वचन देते आणि फिजिक्सचे पुस्तक वाचते. माझ्याकडे परत ये. मला तुझी खूप आठवण येते. माझा मित्र, माझे प्रेम बेबू आणि पुटपुट नेहमीसाठी, असं देखील रियाने म्हटलं आहे.