सिलेगाव ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ध्वजारोहण

आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय सिलेगाव येथे ध्वजारोहण करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची किमया किती थोर हे सर्वांनाच ज्ञात आहे. महाराजांची अशाच या कारकिर्दीतील, जीवनप्रवासातील एक दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.

गोरेगाव 6: आज खास दिवसाचं औचित्य साधत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सरपंच उषा रहांगडाले यांच्या हस्ते ध्वज पुजन करुन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सचिव पी. हरिनखेडे साहेब सौ.लीला रहांगडाले, व सर्व ग्रा.पं.सदस्य, जि.प. शाळा मुख्या.कमलेश मेश्राम व शिक्षक सुंदरसिंग साबळे, टी वाय भगत,आर वाय डहाके, ग्रामरोजगार सेवक रवींद्र चौधरी, संगनक परिचालक सुनिल चौधरी, परिचर शुभम तिरपुडे व गावकरी यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share