भाजपमधील १२६ आमदार मोठ्या बंडाच्या तयारीत ?, ‘या’ कारणामुळे करणार पक्षांतर

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षातील विद्यमान १२६ आमदार दुसऱ्या पक्षात सामील होण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट एक मंत्र्याने केला आहे. हे १२३ आमदार उत्तर प्रदेश मधिल योगी सरकार मधील आहेत. सात महिन्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याआधीच भाजपमध्ये मोठ्या बंडाच्या तयारी दिसून येत आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना येता निवडणुकीत मोठे संकट येण्याची शक्यता आहे. हा गौप्यस्फोट त्यांच्याच सरकारमधील एका मंत्र्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री मुख्यमंत्री यांच्यावर नाराज आहेत. सरकारमध्ये मंत्री आणि आमदारांचे काहीही ऐकून घेतले जात नाही. तसेच त्यांना महत्त्वही दिले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणांवर ही नाराजी आहे. दरम्यान या नाराज आमदारांची योगी आदित्यनाथ कशी समजूत काढणार आहेत. हे आता पहावे लागणार आहे.

योगी सरकारमधील आमदार व मंत्र्यांना विचारात न घेता अनेक कामे केली जातात. तसेच पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा यांना विचारात घेतले जात नाही. मात्र भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसामार्फत सर्व काही ठीक असल्याचे सांगतिले जात आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामार्फत राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी अन्य सदस्यांसोबत योगी आदित्यनाथ सरकारच्या स्थितीचे आकलन केल्यानंतर दावा केला होता की, सर्व काही ठीक आहे. नेतृत्वात बदल होणार नाही. कारण आम्ही मंत्री आणि आमदारांशी चर्चा केलेली आहे. परंतु मंत्री बृजेश पाठक यांनी सांगितले की, बी. एल. संतोष आणि अन्य केंद्रीय नेत्यांनी लखनौत बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. आमदारांशी थेट संवाद साधण्यात आला नाही. या बैठकीत फक्त कोरोना स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवरच चर्चा झाली.

गेल्या काही दिवसांपुर्वी योगी सरकारमधील आमदार राकेश राठोड यांनी आपच्या सकरकावर टीका केली होती. यामध्ये मी अनेक पावले उचलली परंतु, लोकप्रतिनिधींची लायकीच काय आहे? जर मी अधिक बोललो तर माझ्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल. असे विधान आमदार राठोड यांनी केले होते. यावरुन हे स्पष्ट होते की, योगी सरकारमधील आमदार व मंत्र्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.

Share