दहावीचा निकाल जूनमध्ये : नववी-दहावीच्या अभ्यासक्रमावरुन होणार मूल्यांकन

प्रहार टाईम्स
वृत्तसंस्था / मुंबई :
शालेय शिक्षण मंत्री वर्षागायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जून अखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं म्हटलं आहे.

शासनाकडून जीआर जारी
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं दहावी परीक्षेसदंर्भात शासननिर्णय काढला आहे. दहावीच्या परीक्षांचा निकाल लावण्यासाठी निकष आज जाहीर करण्यात आले आहेत. यंदा दहावीच्या मूल्यमापन संदर्भात आज जीआर काढला आहे. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात मोठं आव्हान निर्माण झालं होतं. ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण गेले वर्षभर सुरू होत. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. गतवर्षी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे नववीच्या मुलांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पालक, मुख्याध्यापक यांच्याशी 24 बैठका घेण्यात आल्या, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

दहावी परीक्षेच्या निकालाचे निकष
#वर्षातील लेखी मूल्यमापन – 30 गुण
#दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत – 20 गुण
#नववीचा विषयानिहाय गुण – 50 गुण

दहावीचा निकाल कसा लावणार?
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे.
शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण
ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण
iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकाल 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
2020-21 चा दहावीचा निकाल कोरोना संसर्गामुळे नव्या निकषांच्या आधारे लावण्यात येणार आहे. निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. या निकषानुसार मिळालेले गुण ज्या विद्यार्थ्यांना मान्य नसतील त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर दोन संधी उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

Share