Breaking : 1 जून नंतरही लॉकडाऊन राहणार- मुख्यमंत्री ठाकरे

प्रहार टाईम्स : रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकरचा धोकाही वाढतो आहे. त्यामुळे एकदम लॉकडाऊन न उठवता १ जूननंतर वाढवून मग टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.

दुसरीकडे लॉकडाउन ला विरोध बघावयास मिळत आहे :

“करोना आटोक्‍यात आला; 1 जूनपासून दुकाने सुरू करा’

पुणे -शहरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. व्यापारी वर्ग लॉकडाऊनमुळे त्रस्त आहे. करोनाचा फैलाव अधिक असताना दुकाने बंद ठेवण्यास सर्व व्यापारी वर्गाने सहमती दर्शवली.

आता आटोक्‍यात आल्याने येत्या 1 जूनपासून जीवनावश्‍यक वस्तुंच्या व्यतिरिक्‍त इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे शहर भाजप व्यापारी आघाडीने केली.

त्यावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या दोन ते तीन दिवसांत यासंबंधी निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिल्याची माहिती पुणे शहर भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास यांनी दिली.

Share