कोरोनाचा कोप….(अभंग)
माजला काहूर!दाखव तू रूप!
दुर करावे कोप!आतातरी!!
होते तेही गेले! रोजगार नेले!
संकट हे आले!आम्हावरी!!
वाईट हे क्षण! खचले हे मन!
झाले वन वन!माणसाचे!!
नाते दुर केली!आपुलकी गेली!
माणुसकी नेली!कोरोनाने!!
देवा हाक मारू! दुःख दूर सारू!
दोन हात करू! संयमाने!!
हा कोप टळेल!संकट जाईल!
वेळ ती येईल!विश्वासाने!!
उमेंद्र युवराज बिसेन (प्रेरीत)
गोंदिया (पुणे)
९६७३९६५३११
स.स.ना.क्र-०८८