सोनाली कुलकर्णी (‘अप्सरा’) अडकली लग्नबंधनात… वाढदिवसालाच दिली गोड बातमी
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वाढदिवसादिवशी चाहत्यांना दिली आनंदाची बातमी. गेले अनेक दिवस सोनाली कुलकर्णीच्या प्रेमप्रकरणाविषयी चर्चा सुरु होती. आज अखेर तिने तिच्या लाईफ पार्टनरविषयी माहिती दिली आहे. दुबईमध्ये राहणा-या कुणाल बेनोडेकर याच्याशी 2 फेब्रुवारीला सोनालीचा साखरपुडा झाला होता व 7 मे रोजी तिने दुबईतील एका मंदिरात तिच्या चार मित्रांच्या सहाय्याने अतिशय साध्या पध्दतीने लग्न केलं..
सोनालीने अवघ्या तासाभरात लग्नाची खरेदी केल्याचं सांगितलं. यासोबतच खरेदीत तिने कोणत्या तीन गोष्टी विकत घेतल्या याबद्दलही माहिती दिली. सोनालीने लिहिले की, ‘आम्ही दोन दिवसांतच मे महिन्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर एका तासात लग्नाची खरेदी केली आणि १५ मिनिटांत जवळच्या चार मित्र- मैत्रिणींच्या सहाय्याने मंदिरात जाऊन लग्न केलं. यावेळी आम्ही फक्त वरमाळा, मंगळसूत्र आणि कुंकू या तीन गोष्टींचीच खरेदी केली.’ लग्नाच्या मान्यतेसाठी मंदिराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधींमध्ये या तीन गोष्टी लागतात. यामुळे याच तीन गोष्टी सोनाली आणि कुणालने विकत घेतल्या.
सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सोनालीच्या नावावर अनेक सुपरहिट मराठी चित्रपट आहेत. ‘नटरंग’ चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आणि त्याच चित्रपटातील लावणी ‘अप्सरा आली….. या लावणीमुळे सोनालीची ओळख ‘अप्सरा ‘ म्हणून निर्माण झाली.