पत्नी-मुलासह बाईकवर निघण्यापूर्वी वाचा ‘हा’ नवीन ‘ट्रॅफिक’ नियम, भरावे लागू शकते चालान! New Motor Vehicle Act 2021
वृत्तसंस्था : भारत सरकारने पुन्हा एकदा चलानसंबंधी नियमात बदल केले आहेत. नवीन नियम आल्यानंतर 4 वर्षांच्या मुलाला सुद्धा एक प्रवासी मानले जाईल. जर तुम्ही सुद्धा स्कूटर, मोटरसायकल, अॅक्टिव्हावर आपला मुलगा आणि पत्नी बाहेर जात असाल तर तुमचे चलान फाडले जाऊ शकते.
नवीन मोटर व्हेईकल अॅक्टमध्ये स्कूटर, अॅक्टिव्ह, मोटरसायकलवर 4 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलास तिसरा प्रवासी मानले जाईल. नवीन मोटर वाहन कायद्याच्या कलम 194 अ च्यानुसार या नियमाचे उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. यासोबतच जर तुम्ही कारमध्ये दारू पिताना पकडे गेलात तर पहिल्या वेळेस 10000 किंवा 6 महिने जेल होऊ शकते आणि दुसर्यांदा अशी चूक केल्यास 2 वर्षांचा कारावास आणि 15000 रुपये दंड द्यावा लागेल.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि दंड
वाहतुक नियमाचा प्रकार / जुने चलान / नवी चलान
* सामान्य / 100 रूपये / 500 रूपये
* रस्ता वापर उल्लंघनाचा नियम / 100 रूपये /500 रूपये
* वाहतूक अधिकार्यांच्या आदेशाची अवहेलना करणे / 500 रूपये / 2,000 रूपये
* विना लायसन्स गाडीचा वापर / 1,000 रूपये / 5,000 रूपये
* विना ड्रायव्हिंग लायसन्सने वाहन चालवणे / 500 रूपये / 5,000 रूपये
* पात्रता नसतानाही वाहन चालवणे / 500 रूपये / 10,000 रूपये
* सामान्य ते अधिक वहन / काही नाही / 5,000 रूपये
* जास्त वेग असल्यास / 400 रूपये / 1,000 रूपये
* धोकादायक ड्रायव्हिंग केल्यास / 1,000 रूपये / 5,000 रूपये
* दारू पिऊन गाडी चालवल्यास / 2,000 रूपये / 10,000 रूपये
* वेग / रेसिंग केल्यास / 500 रूपये / 5,000 रूपये
* विना परमिटचे वाहन चालवल्यास / 5,000 रूपयांपर्यंत / 10,000 रूपयांपर्यंत
* एग्रेगेटर (लायसन्स अटींचे उल्लंघन) / काही नाही / 25,000 से 1 लाख रूपयांपर्यंत
* ओव्हरलोडिंग असल्यास / 2,000 रूपये आणि प्रति अतिरिक्त टनावर 1,000 रूपये / 20,000 रूपये आणि प्रति अतिरिक्त टनावर 2,000 रूपये
* प्रवाशांचे ओव्हर लोडिंग असल्यास / काही नाही / 1,000 रूपये प्रति अतिरिक्त प्रवासी
* सीट बेल्ट न लावल्यास / 100 रूपये / 1,000 रूपये
* दोन चाकी वाहनावर ओव्हर लोडिंग असल्यास / 100 रूपये / 2,000 रूपये आणि 3 महिन्यासाठी लायसन्स अपात्र
* हेल्मेट नसल्यास / 100 रूपये / 1,000 रूपये आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स अपात्र
* इमर्जन्सी वाहनांसाठी रस्ता उपलब्ध न केल्यास / काही नाही /1,000 रूपये
* वीम्याशिवाय ड्रायव्हिंग केल्यास / 1,000 रूपये / 2,000 रूपये
* किशोरवयीन द्वारे केलेल्या गुन्ह्यावर / काही नाही /
1. पालक किंवा मालकाला दोषी मानले जाईल.
2. 3 वर्षांचा कारावास आणि 25,000 रूपये दंड.
3. किशोरवयीनावर जेजे कायद्यांतर्गत खटला चालवला जाईल.
4. वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द केले जाईल.
* कागदपत्र लावण्यासाठी वाहतुक अधिकार्यांची पॉवर / काही नाही / ड्रायव्हिंग लायसन्सचे निलंबन.
* वाहतूक अधिकार्याला लागू करण्याने होणारे गुन्हे / काही नाही/ संबंधित सेक्शन अंतर्गत 2 वेळा दंड